पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती

श्रीनगर, 23 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना आज (दि.23) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. मंगळवारी (दि.22) झालेल्या हल्ल्यानंतर मृत पर्यटकांचे पार्थिव श्रीनगरमधील पोलिस नियंत्रण कक्षात बुधवारी सकाळी आणले गेले होते.

https://x.com/AmitShah/status/1914932458816000398?t=5nD0uCy-Bt9gw8flqwzBdw&s=19

अमित शहांकडून हवाई पाहणी

गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर हल्ला झालेल्या पहलगाम मधील बैसरन परिसराची हवाई पाहणी केली. तसेच हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची विचारपूस करण्यासाठी ते अनंतनाग रुग्णालयात जाणार आहेत. दरम्यान, मृत पर्यटकांचे पार्थिव श्रीनगरहून त्यांच्या मूळ राज्यात पाठविण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे.

सर्च ऑपरेशन सुरू

या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर 20 पेक्षा अधिक लोक यामध्ये जखमी झाले आहेत. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर नॅशनल इन्क्वायरी एजन्सी (एनआयए) चे एक पथक बुधवारी श्रीनगरमध्ये दाखल झाले असून, ते पहलगाममध्ये जाऊन निष्पाप नागरिकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांविषयीचे पुरावे गोळा करणार आहे. हल्ल्यानंतर लगेचच पहलगाम परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

मृतांची नावे

या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यातील बहुतांश मृतांची ओळख पटली आहे. यामध्ये नवी दिल्लीतील विजय नरवाल, केरळमधील एन. रामचंद्रन, पश्चिम बंगालमधील बितैन अधिकारी, छत्तीसगडमधील दिनेश अग्रवाल, राजस्थानमधील नीरज उधवानी, महाराष्ट्रातील दिलीप देसाले, महाराष्ट्रातील संजय लक्ष्मण लेले, आंध्र प्रदेशमधील जे. एस. चंद्र मोळी, पश्चिम बंगालमधील समीर गुहा, मध्य प्रदेशातील सुशील नथ्याल, महाराष्ट्रातील अतुल श्रीकांत मोनी, महाराष्ट्रातील हेमंत जोशी सुहार, ओडिशामधील प्रशांत सतपती, आसाममधील टेज हेलविंग, तमिळनाडूमधील मधुसूदन राव, कर्नाटकमधील भारत भूषण, महाराष्ट्रातील सुमित परमार, महाराष्ट्रातील यतीश परमार, कर्नाटकमधील मंजू नाथ राव, महाराष्ट्रातील संतोष जगदाळे, महाराष्ट्रातील कस्तुरबा गणवेट, तर शैलेश भाई, शुभम देसवाल, मनीष रंजन आणि सुदीप नोपानी यांच्या राज्याची ओळख अद्याप पटली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *