बारामती, 24 ऑक्टोबरः दिवाळीच्या पाडव्या दिवशी बारामती येथील गोविंद बागेची चर्चा दरवर्षी राज्य स्तरावर होत असते. राज्यभरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरीक मोठ्या संख्येने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना दिवाळीच्या पाडव्यानिमित्त भेटायला येत असतात. यंदा पाडवा हा बुधवारी, 26 ऑक्टोबर 2022 रोजी आहे. या पाडव्या दिवशी सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत पवार कुटुंब गोविंदबाग येथे नागरिकांना भेटणार आहेत.
पुण्यात पोलिसांचा लाठीचार्जचा व्हिडीओ आला समोर
दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी गोविंदबागेत आमदार, खासदार, मंत्र्यांसह विविध अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक भेटत घेत असतात. कोविडच्या संकटात या प्रथेवर मर्यादा आली होती. यंदा कोविडचे संकट दूर झाल्याने सकाळी आठ वाजल्यापासूनच हे तीनही नेते नागरिकांना भेटणार आहेत.
तरडोलीत तब्बल 222 कार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटप
पाडव्याच्या निमित्ताने गोविंदबागेत दरवर्षी नागरिक या नेत्यांना भेटण्यासह इतर अनेक मित्र परिवाराला देखील भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देतात. यंदा बारामतीच्या प्रथेनुसार ज्येष्ठ नेते शरद पवार हे बुधवारी, 26 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजता ‘श्री महावीर भवन’ येथे व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
One Comment on “गोविंदबागेत पाडवा भेट सोहळ्याचे आयोजन”