निरा- मोरगाव मार्गावरून खडी व गौण खनिजाची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक

बारामती/मुर्टी, 25 नोव्हेंबरः (प्रतिनिधी- शरद भगत) निरा मोरगाव रस्ता हा अतिशय जड वहानांची वाहतुक होत असते. यामध्ये ओव्हरलोड ट्रॅक्टरमधून ऊस, लाईनचे ट्रक किंवा कंटेनर ही अतिवेगाने वाहतुक करत असतात. तसेच हायवा खडी व प्लास्टरसाठी लागणारी डस्ट, विट बनविण्यासाठी लागणारी दगडापासून बनविलेली पावडर -माती आदींची ही वाहतुक मोठ्या प्रमाणात होत असते.

जगात हिंदुहृदयसम्राट फक्त एकच! उद्धव ठाकरेंचा शिंदेवर निशाणा

ही गौण खनिजातील सामग्री सुद्धा उघडपणे वाहतूक करत असल्याने बाकीच्या वाहतूक करणाऱ्यांनाही नाहक त्रास होत असतात. गेल्याच आठवड्यात बारामतीमधील मोरगाव- चिरेखानवाडीच्या हद्दीतील चढावर अर्धा इंचीची खडी सर्वसाधारण अर्धा डंपर रोडवर सांडला होता. या रस्त्यावरुन वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वार व अन्य लहान मोठ्या गाडी चालकांना त्रास झाला आहे.

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतणार?

मुर्टी गावात दोन खडी मशिन व मोढवे गावात दोन खडी मशिन असल्याने संबंधीत खडी मालकांचेच हे डंपर असल्याचेही निदर्शनास येत आहे. अशी खुलेआम खडी, दगड व डस्टची वाहतूक ही झाकून न नेणाऱ्या वाहनांवर कारवाई व्हावी. तसेच मुर्टी गावातून अति गतीने वाहतूक करणाऱ्या वहानांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणीही स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

One Comment on “निरा- मोरगाव मार्गावरून खडी व गौण खनिजाची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *