यावेळी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. बारामती शहरामध्ये सामाजिक सलोखा हा कायमच चांगला असल्याचे बरेच वक्त्यांनी प्रतिपादन केली. याही पुढे सर्व समाजातर्फे सर्वांच धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहकार्य केले जाईल. कोणत्याही प्रकारचे सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याबद्दल पोलिसांना सहकार्य करण्याची सर्व वक्त्यांनी भूमिका मांडली. बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाली बारामती शहर पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
बारामतीत शांतता कमिटी बैठकीसह इफ्तार पार्टी आयोजन

बारामती, 1 मेः बारामतीमधील जुनी तहसील कचेरी येथे बारामती शहर पोलीस ठाण्यात तर्फे शनिवारी, 30 एप्रिल 6.45 वाजण्याच्या सुमारास शहर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व धर्मियांची शांतता कमिटी बैठकीसह इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीवेळी सगळ्या राजकीय पक्षाचे मान्यवर नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, मुस्लिम बांधव, हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.