लोणी भापकरमध्ये क्रिकेट सामन्यांचे आयोजन

बारामती, 14 जानेवारीः(प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 15 जानेवारी 2023 रोजी पासून साहेब चषक 2023 क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे आयोजन लोणी भापकर क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर सामने गाव वाईज आणि फुल स्पीच पद्धतीने खेळवण्यात येतील. प्रथम क्रमांकाचे बक्षीस 51,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 31,000 रुपये, तृतीय क्रमांकाचे बक्षीस 21,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस 11,000 रुपये असेल. सदर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन चेतन मोरे, सोनु आरडे, मन्सूर आत्तार, योगेश आवाडे यांनी केले आहे.

यासह आज, 14 जानेवारी 2023 रोजी याच ठिकाणी भैरवनाथ क्रिकेट क्लबच्या वतीने साहेब चषक 2023 हाफ स्पीच, नाईट क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस 21,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 15,000 रुपये, तृतीय क्रमांकाचे बक्षीस 7070 रुपये, आणि चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस 5050 रुपये असे असतील. हे सामने शुभम खोमणे, अभि पवार, सोनु कांबळे, प्रतिक पांडेकर आणि पप्पू जाधव यांनी आयोजित केले आहेत.

One Comment on “लोणी भापकरमध्ये क्रिकेट सामन्यांचे आयोजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *