विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात ‘युवक महोत्सवा’चे आयोजन

बारामती, 25 सप्टेंबरः बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 रोजी विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ‘स्वररंग’ या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागीय ‘युवक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या बाबतची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, डॉ. लालासाहेब काशीद, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. विजय काकडे, सांस्कृतिक कार्य अधिकारी डॉ. हणमंतराव पाटील व प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉ. श्रीराम गडकर यांनी दिली.

त्या अफवांवर विश्वास ठेवू नका- बारामती शहर पोलीस स्टेशन

या महोत्सवाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते व संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विद्या प्रतिष्ठानच्या ‘गदिमा’ सभागृहात शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न होत आहे.

अनाधिकृत प्लॉटिंगला मोठा दणका

वैयक्तिक शास्त्रीय गायन / वादन, भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत (स्वर व ताल), सुगम संगीत (भारतीय गायन), पाश्चिमात्य गायन, समूह गीत गायन, लोकसंगीत (वाद्यवृंद), लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, वादविवाद, एकांकिका, प्रहसन, मूकनाट्य, मिमिक्री, एकपात्री प्रयोग, चित्रकला, कोलाज, पोस्टर निर्माण, माती कला, व्यंगचित्र, रांगोळी, छायाचित्रण आदी स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थी-विद्यार्थिनी कलवंतांना आपली कला आविष्कृत करता येणार आहे. येथे निवडलेल्या विद्यार्थ्यांना ऑक्टोबर 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवामध्ये प्रवेश मिळेल. या विद्यार्थी-विद्यार्थिनी कलवंतांना पुढे राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवाकरिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात समावेश करण्यासाठी प्राधान्याने विचार केला जाईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *