पुरंदर, 30 मार्चः (प्रतिनिधी- शरद भगत) पुरंदर तालुक्यातील राजुरी गावची भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सव 2 एप्रिल व 3 एप्रिल 2023 रोजी होत आहे. या यात्रेमध्ये लोक मनोरंजनासाठी तमाशा तर कुस्ती शौकीनांसाठी निकाली कुस्तीचे आयोजन यात्रा कमिटीने केले आहे.
कुस्ती मैदान तयार करण्यापासून ते कुस्ती निकाली होईपर्यंत यात्रा कमिटी कटाक्षपणे काम पहात आहे. या कुस्त्यांच्या बक्षिसाची रक्कम देखील मोठी असल्याने कुस्त्या निकालीच होतील, असे ही यात्रा कमिटीने म्हटले आहे. कुस्त्या युट्युबच्या माध्यमातुन लाईव्ह दाखवणार असल्याचे यात्रा कमिटीकडून सांगितले जात आहे.
One Comment on “राजुरीत भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त कुस्तीचे आयोजन”