बारामती, 1 ऑक्टोबरः नुकताच राज्यभरासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बारामती शहरातील वसंतनगर येथे देखील गणेशोत्सवाची धूम यंदा वेगळीच पहायला मिळाली. यंदा श्री अष्टविनायक गणेशोत्सव मित्र मंडळ आणि ओंकारभैय्या जाधव मित्र परिवाराकडून गणेश उत्सवात विविध उपक्रम घेण्यात आले.
बारामतीकरांनी पर्यावरण पूरक गणपती विसर्जन करून घातला पर्यावरण रक्षणाचा आदर्श!
या उपक्रमांमध्ये श्री अष्टविनायक गणेशोत्सव मित्र मंडळ आणि ओंकारभैय्या जाधव मित्र परिवाराच्या वतीने परिसरातील गरीब आणि गरजू कुटंबांना किराणा माल साहित्य किट, तसेच गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या परिसरातील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
यासह महिला वर्गाकरीता खास करून संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या स्पर्धेत विजेतांना बक्षीसही देण्यात आले. या संगीत खुर्ची स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेताला चांदीचे पैंजण, द्वितीय क्रमांकाला सॅमसंग मोबाईल, आणि तृतीय क्रमांकाला पैठण साडी देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आयोजन ओंकार भैय्या जाधव मित्र परिवाराकडून करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदूषण विभागाची पवारांना मध्यरात्री नोटिस!
या स्पर्धांवेळी माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, माजी नगरसेवक अमर धुमाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष विशाल जाधव, श्री अष्टविनायक गणेशोत्सव मित्र मंडळाचे अध्यक्ष गौरव जाधव, समाजिक कार्यकर्ते ओंकार जाधव, सयाजी गायकवाड, राहुल गायकवाड, सचिन जाधव, लखन गायकवाड यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
One Comment on “श्री अष्टविनायक गणेशोत्सव मित्र मंडळ व ओंकारभैय्या जाधव मित्र परिवाराकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन”