निरा डावा अस्तरीकरण विरोधात मेळाव्याचे आयोजन

बारामती, 28 ऑगस्टः पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्यातून जाणाऱ्या निरा डावा कालव्यावरील अस्तरीकरण करण्याचा निर्णय माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेता अजित पवार यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे. निरा डावा अस्तरीकरणाचे काही प्रमाणात काम झाले आहे. मात्र या अस्तरीकरणाच्या बाजूने आणि त्याच्या विरोधातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

अखेर ट्विन टॉवर झाला जमीनदोस्त

दुरूस्तीच्या नावाखाली धरणापासुन ते बारामती पर्यंत ठरावविक ठिकाणी तळातून आणि दोन्ही बाजुने अस्तरीकरणाचे काम सुरु आहे. दरम्यान, बारामती शहरात अस्तरीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. मात्र या कामामुळे शहरातील बहुतांश बोअरचे पाणी बंद झाले आहेत. या अस्तरीकरणामुळे भविष्यात या गावांमध्येही अशीच परिस्थिती होईल, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. यामुळे सदर अस्तरीकरणाच्या कामाला विरोध वाढताना दिसत आहे. बारामती तालुक्यातील जेऊर, मांडकी, पिंपरे, निरा-शिवतकार, निंबुत, गुळूंचे, कर्नलवाडी, राख, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, वाघळवाडी, वाणेवाडी, मुरूम, करंजे, करंजेपुल, सोरटेवाडी, शेंडकरवाडी, मगरवाडी, चौधरवाडी, वाकी, चोपडज, होळ, वडगांव निं, कोन्हाळे बु।।, कोन्हाळे खुर्द, लाटे, माळवाडी, कुरणेवाडी, शिरीष्णे तसेच बारामती पर्यंत कालव्याच्या कमांड भागात असणाऱ्या सर्व गावांमध्ये गंभीर जलसंकट पुढील काळात ओढावणार असल्याने भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

कॅनॉल बचाओ संघर्ष मेळाव्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजु शेट्टी यांचे मार्गदर्शन होणार आहे. मेळाव्यामध्ये वरील विषयांवर चर्चा होवुन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. पाणी संकटावर मात करण्यासाठी सदर गावांमधील शेतकरी 30 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता पुरंदर तालुक्यातील निरा बारामती रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *