ईद-ए-मिलाद सणानिमित्त निवासी मुकबधीर आश्रमशाळेत जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन

बारामती, 17 सप्टेंबर: ईद-ए-मिलाद सणानिमित्त जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. यावेळी बारामती येथील निवासी मुकबधीर आश्रम शाळा याठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे आयोजन बारामतीतील सर्व धर्म समभाव समितीच्या वतीने करण्यात आले होते. पैगंबरांचा उपदेश डोळ्या समोर ठेऊन गोरगरीब व गरजूंना मदत व्हावी आणि एखाद्याच्या मुखात घास भरवावा हा उपदेश समोर ठेऊन त्यांच्या जयंती निमित्त निवासी मुकबधीर आश्रमात हा कार्यक्रम राबविण्यात आला.



याप्रसंगी, तैनूर शेख यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून हजरत पैगंबर यांच्या विषयी माहिती देऊन युवा तरूणांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व धर्म समभाव समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक जोंजारे, सर्व धर्म समभाव समितीचे अध्यक्ष तथा चिकन खरेदी विक्री संघाचे संस्थापक अध्यक्ष मोहीन शेख, गणेश जोंजारे, गणेश गालिंदे, आदिल तांबोळी, चैतन्य गालिंदे, केदार पाटोळे, सोहेल बागवान, वसीम शेख, सुरज ओवाळ, मुजाहीद शेख, पप्पु भिसे, दादाराम धोत्रे, मुजहीद कुरेशी आणि सद्दाम शेख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *