बारामती/मुर्टी, 9 नोव्हेंबरः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील पश्चिम जिरायत भाग कायम दुष्काळ असतो. या गावाने आपलं गाव दुष्काळ मुक्त होऊन एक सुजलाम सुफलाम होण्यासाठी व येणारी नविन पिढी योग्य मार्गाने चालावे, यासाठी परिवर्तन व्याख्यानमाला वर्ष पहिले असा कार्यक्रम आयोजित केला आहे.
न्यूझीलंडचा श्रीलंकेवर विजय; न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या शर्यतीत
आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित झालेले पाटोदा गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांचे “ग्रामविकासाचे गुपित” या विषयावर त्यांचे व्याख्यान उद्या, शुक्रवार 10 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वाजता आहे. या व्याख्यानमालेचे सौजन्य अक्षरज्ञान प्रतिष्ठान मुर्टी हे आहेत.
तर दुसरे व्याख्यान माईंड पॉवर व ट्रेस मॅनेजमेंट ट्रेनर, लेखक डॉ. दत्ताजी कोहिनकर यांचे असून “मनाची अमर्याद शक्ती व तणावमुक्ती” या विषयावर आहे. या व्याख्यानचे सौजन्य डॉ. संकेत सावंत यांनी केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजारांचा दिवाळी बोनस जाहीर
या कार्यक्रमासाठी स्टेज, साउंड सिस्टीम कनेक्शन व इतर सौजन्य धनंजय जगदाळे, उद्योजक गणेश जगदाळे, उद्योजक संकेत जगदाळे आणि हॉटेल राजमुद्रा यांनी सहकार्य केले आहे. कार्यक्रमासंदर्भात आणखीन माहिती हवी असल्यास हरिदास जगदाळे -9545468000 व किरण जगदाळे- 9970234182 यांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
2 Comments on “मुर्टी गावात दिवाळीनिमित्त परिवर्तन व्याख्यानमालेचे आयोजन”