वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

बारामती, 17 जुलैः (प्रतिनिधीः- शरद भगत) बारामती तालुक्यातील मोरगाव येथे आज, 17 जुलै 2022 रोजी रामोशी समाजाचे नेते दौलत (नाना) शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे आयोजन जय मल्हार क्रांती संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आयोजित केले आहे.

अजित पवारांच्या 941 कोटींच्या कामांना स्थगिती

सदर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून झाली. रक्तदान करायला तरुण पिढीनीं रागा लावल्या आहेत. कार्यक्रमासाठी भाजप नेते दिलीप (आप्पा) खैरे, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, संघटनेचे सोशल मीडिया प्रमुख रविंद्र जाधव, नाना मदने यासह अन्य पदाधिकारी, ग्रामस्थ आणि समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *