बारामतीमधील संस्थांनी प्रांताधिकाऱ्यांचे आवाहन

बारामती, 2 जानेवारीः बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे 5 ते 8 जानेवारी 2023 या कालावधीत महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी शहरातील संस्थांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन उप विभागीय अधिकारी  तथा प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.

या स्पर्धेच्या निमित्ताने आज, 2 जानेवारी रोजी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बारामतीचे तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव, दौंडचे तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महमंडळाचे अध्यक्ष धनंजय जामदार, बँकांचे प्रतिनिधी, विविध विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

माळेगावात ऊस गाडीचा अपघात; एकाचा मृत्यू

यावेळी दादासाहेब कांबळे म्हणाले की, बारामतीत ही स्पर्धा होत आहे, ही शहराच्या दृष्टीने अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. शहरातील बँका, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महमंडळ आदी संस्थांनी शासकीय उपक्रमात सहभाग घेवून व्यावसायिक सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून स्पर्धेसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

स्पर्धेसाठी राज्यभरातून येणाऱ्या खेळाडूंना उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. स्पर्धेच्या निमित्ताने बारामती शहरातील नागरिकांना राज्यातील नामवंत खेळाडूंचे खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे, असेही कांबळे म्हणाले.

तब्बल 227 निराधारांची प्रकरणे मंजूर

स्पर्धेत पुरुष वरिष्ठ गटात अहमदनगर जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, धुळे, नाशिक, ठाणे, अमरावती व वाशिम जिल्हा तर महिला वरिष्ठ गटात पुणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, कोल्हापूर, रायगड, नागपूर व अमरावती जिल्हा हे संघ सहभागी होणार असल्याची माहिती महेश चावले यांनी दिली.

One Comment on “बारामतीमधील संस्थांनी प्रांताधिकाऱ्यांचे आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *