हा उपक्रम जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रात 15 जुलैपासून राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, पौड, वडगाव मावळ, शिरोता, पुणे, भांबुर्डा विभागात असणारे महाविद्यालय, शाळा, स्थानिक समुदाय, ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये जनजागृतीच्या दृष्टीने दौंड वनपरिक्षेत्रापासून सुरूवात झाली आहे.
या कार्यशाळेत दौंड वनपरिक्षेत्रांतर्गत आठवड्याच्या कालावधीत 10 शाळा व महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिक असे एकूण 1 हजार 840 नागरिकांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेत रेस्क्यू टिमच्यावतीने विविध प्रजातीच्या प्राण्यांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी नाग, घोणस, फुरसे, मण्यार यासारख्या विषारी सापांची माहिती चित्रफितीद्वारे दिली. यासह बिबट प्रवण क्षेत्रात नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबतही मार्गदर्शन केले. अधिकाधिक शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, स्थानिक नागरिकांनी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.