बारामती, 9 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ ही स्पर्धा 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य एस.एम. धुमाळ यांनी दिली आहे.
बारामतीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू
या स्पर्धेमुळे आयटीआयमधील विविध व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणीनुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अल्प मुदतीचे नवीन कौशल्य अभ्यासक्रम व संबंधित व्यवसायांमधील अत्याधुनिक व अद्ययावत कौशल्यांचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांना प्राप्त होणार आहे.
स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांस शेती व्यवसाय क्षेत्र, स्वयंरोजगार क्षेत्र, महिला रोजगार क्षेत्र, उपयुक्त आधुनिक तंत्रज्ञानावर अधारित अभ्यासक्रम व अन्य उपयुक्त अभ्यासक्रम इत्यादी कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सुचविता येईल.
दैदिप्यमान यशाबद्दल प्रज्योत साबळेचा जाहीर सत्कार!
या स्पर्धेमध्ये संस्थेतील विद्यार्थी व माजी प्रशिक्षणार्थी यांनी आपला सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी संबंधितांनी आयटीआय माळेगाव यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे अवाहन प्राचार्य धुमाळ यांनी केले आहे.
One Comment on “माळेगावात ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’चे आयोजन”