बारामती, 13 जून: बारामती तालुक्यातील सहकार क्षेत्रामध्ये खळबळ. बारामती तालुक्यातील नामांकित सहकारी पतपेढीचे कर्ज वितरण वसुलीचे ताळेबंद फेर तपासणीचे आदेश तालुका निबंधक सहकार यांनी दिलेले आहे.

बारामती तालुक्यातील धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. यांच्या कार्यपद्धतीवर अनेक तक्रारी असून पतसंस्थेच्या संचालकाने संचालकांना व नातेवाईकांना नियमबाह्य कर्ज देऊन अतिरिक्त लाभ घेतल्याची तक्रार अभिजीत महादेव कांबळे यांनी जिल्हा निबंधक यांच्याकडे पुराव्या सहित सादर केली.

याबाबत जिल्हा निबंधक यांच्या आदेशानुसार बारामती सहकार निबंध यांच्या बरोबर सुनावणी लावून दोन्ही बाजूचे ऐकल्यानंतर त्यांनी पतसंस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल व कायदा, नियम, पोटनियमनुसार धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेचे काम चालते की नाही? याची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, बारामती मधील सहकारी अनेक पतपेढ्या नियमबाह्य बेकायदेशीर काम करीत असून अशा अशा पतसंस्थांना वटणीवर आणण्यासाठी बारामती सहकार निबंधक यांनी हे पहिले पाऊल टाकले जात असल्याचे बोलले जात आहे.

या चौकशी दरम्यान पतसंस्थेच्या सर्व काळ्या धंद्याची माहिती कागदपत्र पुराव्यांशी चौकशी अधिकाऱ्यांना देणार असून सभासदांच्या व ठेवीदारांच्या मुंड्या मुरगळून संचालक व संचालकांच्या नातेवाईकांनी कोरोना काळात व इतर वेळी पदाचा गैरवापर करून कायदा नफेखोरी केल्याचे पुरावे दिल्याचे अभिजित कांबळे यांनी सांगितले. चौकशी अधिकाऱ्यांनी धन्वंतरी नागरी या पतसंस्थेची चौकशी व फेर ताळेबंद करण्याचे आदेश दिले आहेत.

