बारामती, 11 मे: (अभिजित कांबळे) बारामती शहर हे गुटखा विक्रीचे आंतर केंद्र जिल्हा बनले असून, कर्नाटक मधून अकलूज मार्गे येणारा गुटख्याचे बारामती केंद्र बनले आहे. बारामती शहराच्या गल्ली बोळात आरोग्यास हानीकारक असलेले व महाराष्ट्रात बंदी असलेले विषारी पान मसाले व गुटखे विकले जात आहेत. त्यामुळे बारामती परिसरात अल्पवयीन कुमार अवस्थेतील तोंडाचा व घशाचा कर्करोग झाल्याचे दिसून येत आहेत.
बारामतीकरांचे आरोग्य धोक्यात आणणारा हा धोकादायक व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने खुलेआम सुरू आहे. हा विचार कर्करोग बाधीत पालक करीत असून, म्हातारपणाचा हा आधार अल्पवयीन बाल अवस्थेत मृत्यूच्या आहारी जात आहे.
या कुकर्मी व्यवसायाला पायबंद कोण घालणार? हे मृत्युचे कारखाने देसाई इस्टेट येथील लुनिया हा खुलेआम चालवत असून त्याला बारामती पोलीस व अन्न व औषध प्रशासनाची खुली सूट आहे.
गुणवडी रोड छत्रपती शिवाजी चौकात वाडकर मळद मध्ये मदने व गायकवाड हे बारामतीच्या भविष्याचे हत्यारे प्रशासनाच्या अर्थिक मगर मिठीत असलेले उद्याचे वैभव नष्ट करत आहे. बारामती प्रशासन पोलीस यंत्रणा बारामतीच्या तारुण्यावर हल्ला करून बारामतीचे शासकीय वैभव नष्ट करीत आहे. स्वतःची आर्थिक हावस भागवण्यासाठी या बाल व तरूण मुलांच्या मृत्यूच्या खाईत टाकणाऱ्याच्या या गुटखा विक्रेत्यांवर व त्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस आर्थिक लाभापोटी अनेक संसार उधवस्थ करणाऱ्या या पोलीस प्रशासनावर बारामतीचे पालनहार जाब विचारणार आहेत की नाय! बारामतीचे विकास मेरू या गुटख्याच्या पाई स्मशानात रूपांतरीत झालेले कुटुंब विकासाचे मॉडल म्हणून जगभर मिरवत फिरणार आहेत का? बारामतीचे पोलीस अवैध धंद्यांना आणखी किती दिवस पोसणार?