बारामतीमधील विरोधी पक्षनेता गायब!

अभ्याः बारामती नगरपरिषदेची निवडणूक जाहीर होते की काय?
संभ्याः होते.., होते.. होते…!
अभ्याः मग, कशी लढत होणार?
संभ्याः राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! साहेब विरुद्ध दादा! दादा विरुद्ध ताई!
अभ्याः म्हंजे? विरोधी पक्ष गायब?
संभ्याः अरं, ही तर काहीच न्हाय. साहेबांच्या शहराध्यक्ष पदासाठी विरोधी पक्षनेत्यानं गळ घातली म्हणे. ताईंची भेट झाली म्हणे.
अभ्याः अफवांचा बाजार!
संभ्याः अनेक नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष साहेबांकडे इच्छुक आहेत. जुनी जानते नेते साहेब भारीच पत्ता काढणार.
अभ्याः न्हाय रे, विरोधी नेत्याचं निश्चित झालं म्हणे. सध्या बारामती शहराकडे ताईंचं लक्ष जास्त आहे. साहेबांच्या मर्जीतला न्हाय होणार तर ताईंच्या तरुण तडबदार, जो सातत्याने निवडूण येतो, जो साहेबांचं कार्य पुढ वाढवल, असाच साहेबांच्या गटाचा शहराध्यक्ष होणार.
संभ्याः होऊ दी बाबा.., होऊ दी… श्रावण गल्लीत लय अध्यक्ष झाल्येत. अजून एक अध्यक्ष. पण बारामतीच्या मतदारांना जरा इज्जत येऊ दे. अन् त्यांचा भाव वाढू दे.
अभ्याः किम्मत वाढू दे.., म्हंण ना!
संभ्याः दादांचं अध्यक्ष पद तांदुळवाडीला दिलं. आता साहेबांचं अध्यक्ष पद शहरातील ताटातील भांडाण वाटीत येईल. खाणार तर दोघं मिळूनच आहेत.
अभ्याः मतदारांचं काय? अन् बारामतीच्या विकासाच्या नावावर चाललेल्या सुशोभिकरणाचं काय?
संभ्याः लिपिस्टीक पावडर लावून नटकीला-वकटीला नटवावी तशी नटवायचा चंग बांधलाय.
अभ्याः अध्यक्ष बदलल्यामुळं बारामती बदलणार आहे का?
संभ्याः बदलणार तर नाहीच पण काही दलालांची नशीबं बदलत्याल. निवडणुकीच्या काळात प्रतिष्ठा मिळेल तात्पुरती! विरोधकांना बसायला खुर्च्या मिळत्याल. घालाय चांगली कपडं मिळत्याल. मटणं-सटणं घरात शिजत्याल. हे नक्की होईल. आता लढाई घरातली हाय. त्यामुळं डाव बी घरातला होणार.
अभ्याः ती जाऊ दे.., विरोधी पक्षनेता जर अध्यक्ष झाला तर त्यो पण वाटपाला कमी न्हाय. त्याझं बी अडजस्टमेन्ट पहिल्यापासून चालु हाय. त्यामुळं त्यो बी तयारीतच हाय. टक्केवारीत हुशार हाय.
संभ्याः करू दी.., कोणाला तरी अध्यक्ष करू दी… पण साहेबांचा अध्यक्ष होऊ दी. अध्यक्ष कोणी बी झालं तरी सत्ता शेठजींचीच राहणार…, मग त्यो कसब्यातला असू न्हाय तर त्यो शहरातला असू.
अभ्याः हे शेठजी बदलं पाहिजेत. सगळं पैकं अन् टक्केवारी शेठजींकडंच कशी?
संभ्याः अध्यक्ष फक्त नावालाच असत्यात. मग त्यो साहेबांचा असू न्हाय तर त्यो दादांचा!
अभ्याः पण ह्या निवडणुकांना मज्या येणार! सगळं मुक्यांनी होणार… गुपीत घाला… गुपीत घाला..!
संभ्याः येवढं मात्र खरं हाय. या निवडणुकीत विरोधी पक्षनेता गायब होणार… लढाई सत्ताधाऱ्यांच्यातच होणार… अन् मतदारांचं चांगभलं, दलालांचं उधो… उधो..!
अभ्याः चल संभ्या निघतो..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *