कंत्राटी भरतीबाबत विरोधकांनी गैरसमज पसरवला- अजित पवार

मुंबई, 21 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) सध्या कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (दि.20) पत्रकार परिषद घेऊन राज्यात कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली होती. यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना विरोधकांवर हल्लाबोल केला होता.

वानखेडे मैदनावरील सामन्यांआधी पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना

“कंत्राटी भरतीचं पाप आमचं नव्हतं. ते पाप तर काँग्रेस सरकारचं होतं. कंत्राटी भरतीचा सर्वात आधीचा जीआर 2003 मध्ये काँग्रेसने काढला होता. त्यांच्या या पापाचे ओझे आमच्या सरकारने का उचलावे. म्हणून आमच्या सरकारने याबाबत सखोल चर्चा करून राज्यातील कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला.” असे फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर सरकार आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कंत्राटी भरतीबाबत विरोधी पक्षांकडून मोठा गैरसमज पसरवण्यात आला होता. तुम्हाला कधीच नोकऱ्या मिळणार नाहीत. अशाप्रकारे सांगून राज्यातील तरूणांची दिशाभूल केली जात होती. त्यामुळेच आमच्या सरकारने कंत्राटी नोकरभरतीचा जीआर रद्द केला आहे.” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

देशातील पहिल्या रॅपिडेक्स ट्रेनचे उद्घाटन

One Comment on “कंत्राटी भरतीबाबत विरोधकांनी गैरसमज पसरवला- अजित पवार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *