राजगुरूनगर, 20 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून ते विविध ठिकाणी सभा घेत आहेत. त्यानुसार मनोज जरांगे यांची आज (दि.20) पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर मध्ये सभा पार पडली. त्यांच्या या सभेला मराठा बांधवांची मोठी गर्दी झाली होती.
टीम इंडियाला मोठा धक्का! हार्दिकच्या दुखापतीविषयी मोठी अपडेट!
या सभेत जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या आत्महत्यांना केवळ सरकारच जबाबदार आहे. जर सरकारने वेळेत मराठा आरक्षण मंजूर केले असते, तर या मराठा बांधवांच्या आत्महत्या झाल्याचं नसत्या. मराठा आरक्षण जोवर मिळत नाही, तोपर्यंत मराठा समाज एक इंचही मागे जाणार नाही.” अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
वाचन- प्रेरणा दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!
मी मराठा समाजांशी मरेपर्यंत गद्दरी करणार नाही. तसेच आम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात आडमुठी भूमिका घ्यायची असती तर आम्ही सरकारला 40 दिवसांची मुदत दिलीच नसती. त्यामुळे राज्य सरकारने आता मराठा आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन आयोजित करावे, अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी सरकारला 24 ऑक्टोबर 2023 पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेणार? याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
One Comment on “या आत्महत्यांना केवळ सरकारच जबाबदार- जरांगे पाटील”