ओन्ली आकाड पार्टी सार्वजनिक बांधकाम विभाग!

बारामती, 26 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) बारामती तालुक्यातील आणि बारामती येथील सार्वजनिक बांधकाम विभाग आज ओस पडल्याचे नागरिक सांगत आहेत. यामध्ये भारतीय नायक यांचे पत्रकार सम्राट गायकवाड व अभिजीत कांबळे यांनी शोध लावला असता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी हे आज आखाड पार्टी साजरी करताना दिसत आहेत. सदरची बोकडाच्या जेवणाची पार्टी ही आर्थिक हित संबंध असणाऱ्या ठेकेदारांनी दिली असलेली समजते.

संबंधितांवर कारवाई होणार का?

त्यामुळे सार्वजनिक माध्यमिक पीडब्ल्यूडी च्या अधिकारी वर्गाने शासकीय गेस्ट हाऊस बुकिंग करून त्यामध्ये ही पार्टी केली असल्याचे भारतीय नायक च्या संपादक आणि कार्यकारी संपादक सम्राट गायकवाड आणि अभिजीत कांबळे यांच्याशी बोलताना सांगितले आहे. आकाड पार्टीमुळे आज प्रशासकीय भवन येथील सार्वजनिक बांधकाम विभाग ओस पाडला होता असे लोकांनी भारतीय नायक च्या पत्रकारांची बोलताना सांगितले आहे. त्यामुळे कामावर उपस्थित न राहणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पालकमंत्री अजित पवार हे कारवाई करणार का? असे येथील नागरिक बोलत आहेत. तसेच ठेकेदाराचे आर्थिक हितसंबंध झोपणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार का? अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *