पोलिसांच्या तत्परतेने वाचले एकाचे प्राण

बारामती, 26 जुलैः बारामती तालुक्यातील पारवडी येथील माळखोप वस्ती नजीक वनीकरण हद्दीत सोमवारी, 25 जुलै रोजी एकजण निपचीत अवस्थेत पडल्याची माहिती बारामती तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळाली. सदर माहिती ही पारवडीचे पोलीस पाटील धनंजय शिंदे यांनी दिली. बारामती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण आणि पीआय लंगुटे यांना सदर माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासकीय वाहनातून सदर व्यक्तीला बारामती महिला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची तजवीज केली.

बारामतीत गरीब गरजू लोकांना श्रवणयंत्राचे वाटप

बारामती तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार जनार्दन भागवत, कॉन्स्टेबल हनुमंत पाटील यांनी शासकीय वाहनातून तातडीने महिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करत उपचार सुरु केला. उपचाराच्या तत्परतेमुळे सदर बेशुद्ध व्यक्ती दुपारी 3.15 च्या सुमारास शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर सदर व्यक्तीचे नाव विजय रमलाल मांजे असल्याचे समजले. सध्या विजयवर महिला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी, ग्राम सुरक्षा दल, सदस्य व पोलीस पाटील यांच्या तत्परतेने एका व्यक्तीचे प्राण वाचण्यास मदत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *