देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एकाला पोलीस कोठडी

मुंबई, 15 मे: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. केतन तिरोडकर असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते माजी पत्रकार आहेत. याप्रकरणी कोर्टाने केतन तिरोडकर यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलीस करीत आहेत.

https://x.com/ANI/status/1790577794310881413

सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केलेला

देवेंद्र फडणवीस हे ड्रग्ज माफियाला मदत करीत असून, ते ड्रग्ज माफियांच्या विरोधात कडक कारवाई करत नसल्याचा आरोप केतन तिरोडकर यांनी केला होता. या संदर्भात केतन तिरोडकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामुळे तिरोडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

3 दिवसांची पोलीस कोठडी

याप्रकरणी केतन तिरोडकर यांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी कोर्टाने केतन तिरोडकर यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलीसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *