भरधाव वेगातील मर्सिडीज कारच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

दिल्ली, 18 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) दिल्लीतील आश्रमाजवळ मर्सिडीज कारने धडक दिल्याने झालेल्या धडकेत राजेश नावाच्या 34 वर्षीय सायकलस्वाराचा मृत्यू झाला. राजेश असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो दिल्लीतील मदनपूर खादर भागातील रहिवासी होता. शनिवारी (दि.18) सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी वाहन जप्त केले असून, आरोपीला ताब्यात घेतले आहे. या अपघातानंतर आरोपी चालक फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

https://x.com/ANI/status/1825047971735769340?s=19

जोरदार धडकेत एकाचा मृत्यू

यावेळी आरोपीने संध्याकाळी पोलिसांसमोर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. प्रदीप गौतम असे या कार चालकाचे नाव आहे. प्रदीप हा गाड्या खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय करतो. या मर्सिडीज कारच्या मालकाने महिन्याभरापूर्वी ही कार प्रदीपकडे विक्रीसाठी दिली होती. तेंव्हापासून प्रदीप गौतम हा या कारचा वापर करीत होता. दरम्यान, राजेश हा एका बंगल्यात माळीचे काम करीत होता. शनिवारी सकाळी तो कामावर जात असताना हा अपघात झाला. यावेळी भरधाव येणाऱ्या कारने राजेशला पाठीमागून धडक दिल्याचे बोलले जात आहे. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

आरोपीचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातानंतर प्रदीप हा फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. आरोपीचा शोध घेत असताना पोलीस मर्सिडीजच्या मालकापर्यंत पोहोचले. यावेळी मर्सिडीज कारच्या मालकाने प्रदीप गौतम याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर प्रदीपने स्वत:हून पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. या अपघाताचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *