परिवहन अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे गेला एकाचा बळी!

बारामती, 4 जानेवारीः बारामती तालुका परिसरात ऊस कारखाने चालू झाले असून नियमबाह्य ऊस वाहतूक जोरात चालू आहे. कित्येकदा परिवहन विभागाकडे तक्रार दिल्यानंतर ही परिवहन खाते कागदी घोडे नाचवत आहे. यामध्ये नागरिकांचे नाहक बळी जात आहे.

दरम्यान, क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक केल्याने बारामती तालुक्यातील मौजे माळेगाव येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॅलीचा अपघात झाला. या अपघातात जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील राजदेहेरे गावातील कृष्णा वसंत जाधव (वय 21) या कामगाराचा बळी गेला आहे. यावरून परिवहन अधिकारी व ऊस वाहतूक ठेकेदार यांचे आर्थिक पूर्ण व्यवहार असल्याचे निदर्शनास येत आहे.

मध्यरात्रीपासून महावितरण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा तीन दिवसीय संप

तसेच बारामती तालुक्यातील मेडद गावात मोरगाव रोडवर विना नोंदणीकृत ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने सोमवारी, 2 जानेवारी 2023 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास अपघात झाला. या भीषण अपघातात चारचाकीमधील एकजण गंभीररित्या जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. साहिल मुलाणा असे अपघातात जखमा झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदर गाडीत तो एकटाच होता. एअर बॅगमुळेच साहिल वाचल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

सदरची घटना मेढद गावामध्ये घडली असून या अपघाताची नोंदणी पोलीस दप्तरी झाली आहे. यामध्ये जुजबी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, माळेगावात ज्या अपघातग्रस्ताचे प्राण गेले, त्या वाहनावर आणि मालकावर परिवहन विभागाने अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही.

बारामतीत राज्य ऑलम्पिक स्पर्धा क्रीडाला सुरुवात

परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे आर्थिक हित संबंधांमुळे परिवहन अधिकारी गब्बर होत आहेत, तर यांच्या कर्तृत्वाने सर्व साधारण कामगारांचे जीव मातीमोल झाले आहेत. सदर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यावर आर्थिक आणि राजकीय मेहरबानी का? या सर्व बाबींवर नजर कोणाची आहे? हा प्रश्न सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

One Comment on “परिवहन अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे गेला एकाचा बळी!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *