पुणे, 19 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एसटी बस आणि ट्रक यांच्यात मोठी धडक झाली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण जखमी झाले आहेत. शनिवारी (दि.19) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. हा अपघात पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ पीएस कामशेत परिसरातील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झाला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही एसटी बस अहिल्यानगरहून मुंबईकडे जात होती. त्यावेळी ही बस ट्रकला पाठीमागून धडकली. त्यावेळी ही दोन्ही वाहने एकाच दिशेने जात होती, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.
https://x.com/PTI_News/status/1847509678181208381?t=uTCBMqVuM3S1c0wSPHng4Q&s=19
पोलिसांनी दिली अपघाताची माहिती
ही एसटी बस अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी आगारातून मुंबईकडे जात जात होती. त्यावेळी कामशेत परिसरातील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ही बस एका ट्रकला धडकली. या अपघातात दुर्दैवाने 1 प्रवासी ठार झाला असून, 7 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. या अपघाताचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.
https://x.com/ANI/status/1846889181546414310?t=h6UYPzMWpmbyLSK9S-eRTA&s=19
दोन दिवसांपूर्वी अपघात झाला होता
दरम्यान, गेल्या गुरूवारी (दि.17) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एका खासगी बस आणि कंटेनर ट्रक यांचा अपघात झाला होता. या अपघातात 23 जण जखमी झाले होते. यातील 11 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली होती. या जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही बस आज सकाळी कोल्हापूरहून मुंबईतील बोरिवलीकडे जात होती. त्यावेळी ही बस मोठ्या कंटेनरला धडकली असण्याची शक्यता पुणे ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.