अंधेरी हिट अँड रन प्रकरणात एकाला न्यायालयीन कोठडी

मुंबई, 05 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील अंधेरी येथील एका हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी काल आरोपी ड्रायव्हरला अटक केली होती. त्यानंतर आज त्याला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. दरम्यान, मुंबईतील अंधेरी येथे एका चारचाकी वाहनाने दोन सायकलपटूंना उडवले होते. ही अपघाताची घटना 29 जून 2024 रोजी घडली होती. तेंव्हापासून हा आरोपी ड्रायव्हर फरार होता.

https://x.com/ANI/status/1809097018805268702?s=19

29 जूनला झाला होता अपघात

ही अपघाताची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपास करून या अपघातास कारणीभूत असलेल्या आरोपीला काल अटक केली. त्यानंतर कोर्टाने या आरोपीची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तत्पूर्वी, अंधेरी येथील या अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे. 29 जून रोजी सकाळी अंधेरीतील उड्डाणपुलावर हे दोघे सायकलवरून जात होते. त्यावेळी अचानकपणे पाठीमागून एका चारचाकी वाहनाने दोन्ही सायकलपटूंना उड्डाणपुलावर जोरदार धडक दिली.

एकाचा मृत्यू, एक जखमी

या धडकेमुळे त्यातील एकजण उड्डाणपुलावरून खाली पडला, त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारादरम्यान या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर या अपघातात दुसऱ्या तरूणाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर आरोपी फरार झाला होता. या अपघाताची पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन त्यांनी फरार झालेल्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्या विरोधात विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या अपघाताचा सध्या पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *