नवी दिल्ली, 16 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारतात आज विजय दिवस साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 1971 च्या युद्धातील देशाच्या शूर वीरांना आदरांजली वाहिली. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. ज्यांच्या बलिदानामुळे भारताचा निर्णायक विजय झाला, त्यांचा अविचल आत्मा आणि समर्पण राष्ट्राच्या इतिहासात आणि भारतीय लोकांच्या हृदयात कायमचे कोरलेले आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
“आज विजय दिवस, आम्ही सर्व शूर वीरांना मनापासून श्रद्धांजली वाहतो. ज्यांनी 1971 मध्ये भारत निर्णायक विजयाची खात्री करून सेवा केली. त्यांचे शौर्य आणि समर्पण ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांचे बलिदान आणि अविचल आत्मा लोकांच्या हृदयात आणि आपल्या राष्ट्राच्या इतिहासात कायमचा कोरला जाईल. भारत त्यांच्या धैर्याला सलाम करतो आणि त्यांच्या अदम्य आत्म्याचे स्मरण करतो,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1735862533947605275?s=19
https://twitter.com/ani_digital/status/1735880249466933266?s=19
16 डिसेंबर हा विजय दिवस भारताने 1971 च्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या युद्धात भारताने पाकिस्तानी लष्कराचा दारूण पराभव केला होता. त्यावेळी या युद्धाच्या समाप्तीनंतर 93 हजारांहून अधिक पाकिस्तानी सैन्याने आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला, जो आज बांगलादेश म्हणून ओळखला जातो. हे युद्ध भारतासाठी ऐतिहासिक ठरले आणि प्रत्येक देशवासीयाच्या मनात उत्साह निर्माण केला. दरम्यान, 1971 च्या युद्धात सुमारे 3 हजार 900 भारतीय जवान शहीद झाले होते. तर यामध्ये 9 हजार 851 जखमी झाले होते. त्यामुळे भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या या विजयाचा गौरव करण्यासाठी आजच्या दिवशी देशभरात विजय साजरा केला जातो.