नवी दिल्ली, 30 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) महात्मा गांधी यांची आज 76 वी पुण्यतिथी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. तसेच याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्यासह अनेक मंत्र्यांनी राजघाटावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली.
https://twitter.com/AHindinews/status/1752201906838253655?s=19
https://twitter.com/AHindinews/status/1752203819688296947?s=19
https://twitter.com/narendramodi/status/1752184141549117543?s=19
त्यांचे बलिदान लोकांची सेवा करण्यासाठी प्रेरित करतात: पंतप्रधान
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. “मी पूज्य बापूंना त्यांच्या पुण्यतिथीला विनम्र अभिवादन करतो. आपल्या देशासाठी शहीद झालेल्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो. त्यांचे बलिदान आम्हाला लोकांची सेवा करण्यासाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
https://twitter.com/AmitShah/status/1752171545085219311?s=19
गांधीजींचे शांतता आणि सौहार्दाचे संदेश आजही प्रासंगिक आहेत: अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विट करून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. “सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबुन देशवासियांच्या हृदयात स्वदेशीची भावना जागृत करणाऱ्या महात्मा गांधीजींना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. गांधीजींचे शांतता आणि सौहार्दाचे संदेश आजही प्रासंगिक आहेत आणि त्यांचे विचार देशवासियांना राष्ट्रासाठी बलिदान आणि स्वतःला समर्पित करण्याची प्रेरणा देत राहतील,” असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/INCIndia/status/1752210232766320779?s=19
राहुल गांधींनी वाहिली आदरांजली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सध्या भारत जोड़ो न्याय यात्रा सुरू आहे. राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शिबिरस्थळी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या फोटोला पुष्पहार घालून त्यांना वंदन केले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.