बारामती, 26 ऑक्टोबरः दीपावली हा सण दिव्यांचा सण म्हणूनही भारतासह जगात साजरा होतो. यामुळे बारामती तालुक्यातील माळेगावमधील तरुणांनी एकत्र येऊन स्मशानभूमीत दीपोत्सव साजरा केला. दिव्यांच्या लखलखाटाने स्मशानभूमी उजळून निघाली आहे.
‘मायेचा एक घास जवानांसाठी’ उपक्रमास शरद पवारांकडून हिरवा झेंडा
सध्या दिवाळीचा सण सुरू आहे. सगळीकडे दिवे उभारून हा सण साजरा होत आहे. प्रकाशपर्व उजळत आहे. या सणाचे औचित्य साधून नीरा- बारामती रोडवरील मुख्य स्मशानभूमीत एकत्र येऊन स्वखर्चाने दीपोत्सव केला आहे.
विनायक निम्हण यांचं निधन; सुप्रिया सुळेंकडून श्रद्धांजली
या स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर मोठा आकाशकंदील उभारला आहे. तसेच सुमारे 700 पणत्या लावून स्मशानभूमीत उजेड पसरला आहे. हा उपक्रम एस. के. सावंत, निलेश होले, महेश होले, सिद्धार्थ कोथमिरे, भरत तावरे यांनी राबविला आहे.
One Comment on “दिवाळीनिमित्त चक्क स्मशानभूमीत दिव्यांचा लखलखाट!”