देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला

दिल्ली, 15 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) भारताचा आज (दि.15 ऑगस्ट) 78 वा स्वातंत्र्यदिन आहे. देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग 11 वेळा देशाचा राष्ट्रध्वज फडकावण्याचा मान मिळाला आहे. या बाबतीत पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मागे टाकले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 दरम्यान लाल किल्ल्यावर 10 वेळा राष्ट्रध्वज फडकावला होता. दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते.

https://x.com/AHindinews/status/1823903373097308368?s=19

https://x.com/AHindinews/status/1823905430411813271?s=19

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून देशवासीयांना संबोधित केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी मरण पत्करले आणि आपले जीवन अर्पण केले त्या स्वातंत्र्यप्रेमींना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा आजचा दिवस आहे. हा देश त्यांचा ऋणी आहे. अशा प्रत्येक देशवासियांबद्दल आम्ही आदर व्यक्त करतो, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. या वर्षी आणि गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींमुळे आपली चिंता वाढत आहे. नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य आणि संपत्ती गमावली आहे. आज मी त्या सर्वांप्रती शोक व्यक्त करतो आणि या संकटाच्या वेळी हा देश त्यांच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.

https://x.com/AHindinews/status/1823906625721393533?s=19

https://x.com/AHindinews/status/1823908352260468749?s=19

एक काळ असा होता जेव्हा लोक देशासाठी मरायला कटिबद्ध होते. आज देशासाठी जगण्याची बांधिलकी करण्याची वेळ आली आहे. देशासाठी मरण्याची बांधिलकी जर स्वातंत्र्य मिळवून देऊ शकते तर, देशासाठी जगण्याची बांधिलकी भारतालाही समृद्ध करू शकते, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. लाल किल्ल्यावरून देशातील 18 हजार गावांना कालमर्यादेत वीज पोहोचवणार असे सांगितले जाते आणि ते काम पूर्ण होते, तेव्हा विश्वास अधिक दृढ होतो, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

https://x.com/AHindinews/status/1823918322859315493?s=19

विकसित भारताचे लक्ष्य साध्य करू

आम्ही 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करू. जेव्हा धोरण योग्य असेल, हेतू योग्य असतील आणि पूर्ण समर्पणाने राष्ट्राचे कल्याण हाच मंत्र असेल, तेंव्हाच निश्चित परिणाम साध्य होतात. मी स्वप्न पाहिले आहे की, 2047 च्या विकसित भारताच्या स्वप्नात सर्वसामान्यांच्या जीवनात सरकारचा हस्तक्षेप कमी झाला पाहिजे. जिथे सरकारची गरज आहे तिथे कमतरता नसावी आणि सरकारचा अनावश्यक प्रभाव नसावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

https://x.com/AHindinews/status/1823920112715620599?s=19

6G वर काम सुरू: मोदी 

सेमीकंडक्टर भविष्याशी जोडलेले आहे. आम्ही सेमीकंडक्टर मिशनवर काम सुरू केले आहे आता सेमीकंडक्टरचे उत्पादन भारतातही होणार आहे. जगाला एंड-टू-एंड सोल्यूशन्स देण्याची आपल्याकडे क्षमता आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. 5G भारतातील जवळपास सर्व भागात पोहोचले आहे. आम्ही 5G वर थांबणार नाही. आम्ही आतापासूनच 6G वर मिशन मोडमध्ये काम करत आहोत, अशी माहिती देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *