बारामती, 4 सप्टेंबरः एखादी निवडणूक जिंकण्यासाठी भाजप पक्ष हा प्रचंड सक्रिय होत असतो. आगामी काळात 2024 मध्ये महाराष्ट्रासह देशात लोकसभेच्या निवडणूक होणार आहेत. मात्र भाजप आतापासून लोकसभा निवडणूकीच्या तयारीला लागला आहे.
दरम्यान, राज्यात भाजपने एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून शिवसेनेचा गेम केला. आता यानंतर भाजपचा मोर्चा हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे वळविला आहे. भाजप नेते राम शिंदे यांनी अमेठीचा कार्यक्रम झाला आहे, पण आता बारामतीचा कार्यक्रम करायचा आहे’ असे मोठं सूचक वक्तव्य शनिवारी, 3 सप्टेंबर रोजी बारामतीमधील भाजप कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले आहे.
शेटफळ तलावाच्या अस्तरीकरणासाठी निवेदन
बारामीत दौऱ्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या 22, 23 आणि 24 सप्टेंबरला येणार आहेत. या दौऱ्यावरुन भाजप 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागल्याचे राम शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.
राम शिंदे म्हणाले की, ‘A म्हटलं की अमेठी आणि B म्हटलं की बारामती. अमेठीचा कार्यक्रम 2019 मध्ये झाला. त्यावेळेस बारामती थोडक्यात वाचले, आता मात्र 17 महिन्याआधीच आम्ही तयारी सुरू केली आहे. शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा उमेदवार निवडून आणून राष्ट्रवादीचे राज्यासह देशपातळीवरील आव्हानच निकाली काढण्यासाठी भाजप सक्रिय झाल्याचे शिंदे म्हणाले.