बारामतीच्या मुख्याधिकारी आणि तहसिलदारांना नोटीस

बारामती, 28 डिसेंबरः बारामती शहरातील कऱ्हा नदी पात्राशेजारी 7 ते 8 बेकायदेशीर कत्तलखाने पत्राचे शेड आणि बांधकाम करून स्थापन करण्यात आली आहेत. सदर बेकायदेशीर कत्तलखाने काढण्यात यावेत, यासाठी दोनदा निवेदन देण्यात आली आहेत. मात्र निवेदन देऊनही कारवाई न केल्याने मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आणि बारामतीचे तहसिलदार विजय पाटील यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

बारामती शहरातील कऱ्हा नदी पात्रामधील 7 ते 8 बेकायदेशीर कत्तलखाने पत्र्याचे शेड आणि बांधकामांवर कारवाई करून ते तात्काळ तोडावेत, असे शिवशंकर स्वामी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, 16 मार्च 2019 आणि 13 जुलै 2021 रोजी लेखी निवेदन देऊनही नगरपरिषदेकडून सदर बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई झालेली नाही. तसेच 16 मार्च 2019 पासून ते आजपर्यंत या संदर्भात एकही गुन्हा दाखल झालेला नसल्याने नगरपरिषदेच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

सदर बेकायदेशीर कत्तलखान्यांवर बारामतीसह इंदापूर तालुल्यातील भिगवण आणि सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील असंख्य गाई-वासरे कत्तलीसाठी आणली जात आहेत. सदर गोमांस हे स्थानिकसह पुणे आणि मुंबई या ठिकाणी विक्रीसाठी पाठविले जातात. सदर विक्री ही बेकायदेशीरपणे सर्रास सुरु आहे.

महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 नुसार सन 2015 पासून संपूर्ण गोवंश म्हणजे गाई-बैल-वासरू वळू यांच्या कत्तलीला बंदी घातलेली आहे. मात्र बेकायदेशीर कत्तलखाने राजरोसपणे सुरू आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांच्या आत कारवाईवरून पाडून टाकावे, अन्यथा न्यायालयामध्ये कायदेशीर कारवाई कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा या नोटिसीमध्ये देण्यात आला आहे.

बारामतीत कृषी व उद्योजकता विकास प्रशिक्षण संपन्न

One Comment on “बारामतीच्या मुख्याधिकारी आणि तहसिलदारांना नोटीस”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *