अरविंद केजरीवाल यांना तात्काळ दिलासा नाही, जामीनावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला

दिल्ली, 01 जून: (विश्वजीत खाटमोडे) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वैद्यकीय कारणास्तव दाखल केलेल्या अंतरिम जामीन याचिकेवरील निर्णय दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने राखून ठेवला आहे. तर कोर्ट अरविंद केजरीवाल यांच्या या जामिनावर आता 5 जून रोजी निर्णय देणार आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्या जामीनाचा कालावधी आज समाप्त झाला असल्यामुळे त्यांना उद्याच आत्मसमर्पण करावे लागणार आहे. तत्पूर्वी, अरविंद केजरीवाल यांनी वैद्यकीय कारणास्तव जामीनाची मुदत वाढवून द्यावी, यासाठी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली.

https://twitter.com/ANI/status/1796846117495435700?s=19

https://twitter.com/ANI/status/1796840346644795889?s=19

5 जूनला जामीनावर निर्णय

परंतु, कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना तात्काळ दिलासा देण्यास नकार दिला आहे. या सुनावणी दरम्यान ईडीने केजरीवाल यांच्या जामीनाला विरोध दर्शवला. अरविंद केजरीवाल हे त्यांच्या आरोग्याबाबत खोटे सांगत असल्याचा आरोप यावेळी ईडीने केला. त्यानंतर कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावरील निर्णय 5 जूनपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना उद्या (दि.02) पुन्हा एकदा तुरूंगात जावे लागणार आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अंतरिम जामीन मागितला आहे.

उद्या तुरूंगात जावे लागणार

दोन दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करून वैद्यकीय तपासणीसाठी अंतरिम जामीन एक आठवड्याने वाढवण्याची मागणी केली होती. मात्र, जामिनाची मुदत वाढवून मागितलेल्या अर्जावर तात्काळ सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता. त्यानंतर केजरीवाल यांनी यासंदर्भात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात धाव घेतली. दरम्यान, कथित दारू घोटाळ्याच्या आरोपावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत जामीन दिला होता. या जामीनाची मुदत आज समाप्त झाली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना उद्या पुन्हा एकदा तुरूंगात जावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *