मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून एकही पात्र महिला वंचित राहणार नाही, अजित पवार यांचा शब्द

बारामती, 15 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पार्श्वभूमीवर बारामती पंचायत समिती येथे रविवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा मिळणार आहेत. त्यासाठी राज्यातील महिलांनी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचा लाभ महिलांना रक्षाबंधन बंधन पर्यंत त्यांच्या थेट बँक खात्यात मिळेल, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1812368245187658157?s=19

https://x.com/ANI/status/1812466034412011995?s=19

महिलांना स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट

राज्य सरकारने या अर्थसंकल्पात राज्यातील सर्व घटकांसाठी विविध योजनांचा आणल्या आहेत. महिलांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी या अर्थसंकल्पात महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी उपयोगी असणारी पिंक ई-रिक्षा योजना, महिलांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, याशिवाय 8 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने या अर्थसंकल्पात घेतला आहे. असे अजित पवार यावेळी म्हणाले.

अजित पवारांचे आवाहन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. त्यासाठी राज्य सरकारने वर्षाला 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी ऑनलाईन कवा ऑफलाईन अर्ज करावेत, असे अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना ही जुलै महिन्यापासूनचा लाभ मिळणार असल्यामुळे महिलांनी अर्ज करण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

एकदम 2 महिन्यांचा लाभ मिळणार

जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचा 3000 रुपयांचा लाभ महिलांना त्यांच्या बँक खात्यात रक्षाबंधन बंधन पर्यंत जमा होणार आहेत. या योजनेसाठी पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 34 हजार 498 इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी बारामती तालुक्यात 7 हजार 648 इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी गावतील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आदी स्थानिक यंत्रणेशी संपर्क साधावा. अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *