निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला, पाहा कोणत्या घोषणा केल्या

दिल्ली, 23 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असून आहे. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत विविध प्रकारच्या घोषणा केल्या आहेत. शेतकरी, गरीब, महिला आणि युवा वर्गावर लक्ष केंद्रीत करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी म्हटले आहे. भारतातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास ठेवून आम्हाला तिसऱ्यांदा पुन्हा निवडून दिले आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

https://x.com/AHindinews/status/1815621889135673692?s=19

https://x.com/AHindinews/status/1815623244373774450?s=19.

मोफत धान्य योजनेला मुदतवाढ

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना 5 वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. या योजनेचा फायदा 80 कोटी लोकांना फायदा झाला असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. अंतरिम अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे आपल्याला गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही सर्व प्रमुख पिकांसाठी उच्च किमान आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत, अशी माहिती देखील निर्मला सीतारामन यांनी यावेळी दिली.

https://x.com/AHindinews/status/1815623647974858891?s=19

शिक्षण, रोजगार आणि कौशल्यांसाठी 1.48 लाख कोटींची तरतूद

भारताची आर्थिक वाढ ही एक नेत्रदीपक अपवाद आहे आणि पुढील काही वर्षांतही तशीच राहील. भारताची चलनवाढ कमी आणि स्थिर आहे आणि 4% च्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच निर्मला सीतारामन यांनी देशातील तरूणांसाठी नवी घोषणा केली आहे. 2 लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय खर्चासह 5 वर्षांतील 4.1 कोटी तरूणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी 5 योजना आणि उपक्रमांचे पंतप्रधान पॅकेज जाहीर करताना मला आनंद होत आहे. यावर्षी आम्ही शिक्षण, रोजगार आणि कौशल्यांसाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असे निर्मला सीतारामन यांनी यावेळी म्हटले आहे.

https://x.com/AHindinews/status/1815626503742501244?s=19

उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणार

या अर्थसंकल्पात यावर्षी देशातील कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी घोषणा करताना निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, देशांतर्गत संस्थांमधील उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकार आर्थिक मदत करेल. त्यानुसार, दरवर्षी 25,000 विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मॉडेल स्किल लोन योजनेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. देशभरातील संस्थांमधील उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचे ई-व्हाउचर दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना कर्जाच्या रकमेवर 3 टक्के वार्षिक व्याज सवलत थेट दिली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

https://x.com/AHindinews/status/1815632737673552151?s=19

1 कोटी तरूणांना इंटर्नशिपच्या संधी

निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात नवीन नोकरदार तरूणांसाठी एक योजना आणली आहे. त्यानुसार, केंद्र सरकार 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरूणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक योजना सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत संबंधित तरूणांना 5000 रुपये प्रति महिना इंटर्नशिप भत्ता आणि 6000 रुपये एकवेळ सहाय्य देण्यात येणार आहे.

https://x.com/AHindinews/status/1815633386507313330?s=19

दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज

तसेच अर्थमंत्र्यांनी यावेळी 300 युनिटपर्यंत मोफत विजेची घोषणा केली आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत छतावर सौर पॅनेल बसवले जातील, ज्यामुळे 1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकेल, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. तसेच पीएम आवास योजनेअंतर्गत देशात 3 कोटी अतिरिक्त घरांची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली आहे.

https://x.com/AHindinews/status/1815639290942300314?s=19

https://x.com/AHindinews/status/1815638832450314497?s=19

कॅन्सरवरील औषधे स्वस्त

याशिवाय, तीन कॅन्सर उपचार औषधांना मूळ सीमा शुल्कातून सूट दिली जाईल. त्यामुळे कॅन्सरवरील तीन औषधे स्वस्त होणार आहेत. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात मोबाईल फोन आणि चार्जर स्वस्त करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. मोबाईल फोन आणि मोबाईल पीसीबीएस आणि मोबाईल चार्जरवर बीसीडी 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव देत असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *