एनआयएने 6 दहशतवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले

मुंबई, 28 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) ISIS या दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावरून भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या 6 जणांच्या विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आरोपपत्र दाखल केले आहे. या सर्व आरोपींना एनआयएने यापूर्वी महाराष्ट्रातून अटक केली होती. ताबीश नासेर सिद्दीकी, झुल्फिकार अली बडोदावाला, शर्जील शेख, आकीफ अतीक नाचन, जुबेर नूर मोहम्मद शेख, अदनानली सरकार अशी या आरोपींची नावे आहेत. ते सर्व ISIS या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. भारतभर दहशत पसरवण्यासाठी हे आरोपी काम करीत होते.

https://twitter.com/NIA_India/status/1740332644704174537?s=19

तसेच त्यांनी लोकांमध्ये भीती आणि दहशत पसरवण्याच्या आणि भारताच्या धर्मनिरपेक्ष आचारसंहिता आणि संस्कृती आणि लोकशाही शासन प्रणालीच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने संघटनेच्या दहशतवादी कारवायांना पुढे नेण्याचा कट रचला होता. यातील दोन आरोपी, झुल्फिकार अली बडोदावाला आणि आकीफ अतीक नाचन यांच्यावर यापूर्वी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी आयईडी बनवल्याबद्दल पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.



आरोपपत्र दाखल केलेले हे 6 आरोपी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) च्या हिंसक आणि अतिरेकी विचारसरणीचा सक्रियपणे प्रचार करण्यात गुंतले होते. एनआयएच्या मुंबई शाखेला आरोपींकडे दहशतवादी संघटनेशी संबंधित अनेक गोष्टी सापडल्या होत्या. यामध्ये विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. तसेच या छाप्यादरम्यान काही मासिके सापडली होती. जप्त केलेल्या वस्तूंवरून आरोपींचे दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. हे आरोपी त्यांच्या दहशतवादी योजना आणि डिझाइनसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी निधी गोळा करत असल्याचे एनआयएच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *