मुंबई, 12 सप्टेंबरः कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय अधिवेशन नुकतेच पार पडले. सदर अधिवेशन शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, पी. सी. चाको, फौजिया खान यांनी पक्षाची धोरणे आणि कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले. मात्र या अधिवेशनात अजित पवार यांना बोलू दिले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यामुळे या चर्चेवर पूर्णविराम ठेवण्यासाठी स्वतः अजित पवारांनीच मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. या पत्रकार परिषदेत नाराजीच्या बातम्यांना काहीही अर्थ नसल्याचे अजित पवारांनी सांगितले.
बारामती लोकसभा रासप संपुर्ण ताकदीने लढणार
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेत्यांनी बोलण अपेक्षित असतं. त्यामुळे त्याठिकाणी मी बोलणं टाळलं. कालच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी देशभरातून नेते आले होते. त्यांना बोलायला वेळ हवा असतो, म्हणून मी ती भूमिका घेतली. मी वॉशरूमला गेलो होतो, पण लोकांनी वेगळा अर्थ काढला आणि उगाच मी नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या.” असं स्पष्टीकरण देत अजित पवारांनी खंत बोलून दाखवली.