अजित पवारांवर विधान सभेची नवीन जबाबदारी

मुंबई, 4 जुलैः आज, 4 जुलै रोजी एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधान सभागृहात 99 विरुद्ध 164 असे विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकला आहे. त्यामुळे राज्यात शिंदे- फडणवीस सरकार बहुमतात आले आहे. तसेच आज राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिनंदन प्रस्ताव पारीत झाला आहे. या अभिनंदन प्रस्तावावेळी अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंसह इतर नेत्यांचा त्यांच्या भाषा शैलीत खरपूस समाचार घेत सभागृहात खेळीमेळीचे वातावरण तयार केले.

दरम्यान, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राज्याची नवीन जबाबदारी पडली आहे. अजित पवार हे विधान सभागृहाचे नवे विरोधी पक्ष नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील अडीज वर्षे अजित पवार हे विरोधी पक्षनेते पद संभाळणार आहेत. येत्या काळात अजित पवारांचा बेधडक, रोखठोक, हजर जबाबी गावरान बाणा चांगलाच दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *