डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची नवीन कार्यकारिणी जाहीर

बारामती, 29 मार्चः बारामती शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव मोठ्या उत्सहाने आणि मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. सदर जयंतीच्या मिरवणुकीत तालुक्यासह आसपासच्या परिसरातील भिमसैनिकांसह इतर समाजातील लोकही अभिवादन करण्यासाठी येत असतात. यंदा बारामती शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 132 वी जयंती साजरी होत आहे. नुकतीच या जयंती महोत्सवाची बैठक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे 28 मार्च 2023 रोजी सायंकाळी संपन्न झाली.

पुण्याच्या माजी पालकमंत्र्यांचे निधन; शरद पवारांनी वाहली श्रद्धांजली!

सदर बैठकीत राजकीय, सामाजिक सह इतर क्षेत्रात काम करणाऱ्या भिमसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या बैठकीत 5 मार्च 2023 रोजी निवड केलेल्या कार्यकारिणीला बरखास्त करण्यात आले. त्यानंतर नवीन कार्यकारिणीला एक मुखाने अनुमोदन देण्यात आले.

यंदाच्या जयंती महोत्सव समितीची कार्यकारिणी पुढील प्रमाणेः अध्यक्ष पदी सिद्धार्थ सोनवणे, कार्याध्यक्ष पदी भास्कर दामोदरे, उपाध्यक्ष पदी विराज अवधूते, आदित्य सोनवणे, संदीप रणदिवे, स्वप्निल गायकवाड आदींची नावे आहेत, तर खजिनदार पदी विशाल गायकवाड, सह कार्याध्यक्ष पदी शुभम गायकवाड, सह कार्याध्यक्ष पदी आदित्य साबळे यांची निवड करण्यात आली आहे.

बारामती तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील ग्रामस्थांची आ. पडळकरांना साकडं!

सदर बैठकीला माजी नगर सेवक सुधीर सोनवणे, माजी विरोधी पक्षनेते विजय गव्हाळे, किशोर सोनवणे (गुरुजी), रामभाऊ खरात, बानप आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, भाजप अनु. जाती महाराष्ट्र प्रदेश सदस्य सचिन साबळे, आरपीआय बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, आरपीआय तालुका अध्यक्ष संजय वाघमारे, अभिनव दहिहंडी संघाचे अध्यक्ष राकेश वाल्मिकी, आरपीआय पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रवींद्र सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते दयावान दामोदर, उद्योजक अमोल वाघमारे, सचिन मोरे, सोहेल शेलार, सागर कवडे, ऍड. रोहन कांबळे, रोहन माघाडे, गौरव अहिवळे, अक्षय शेलार, सागर लोंढे यासह आजी-माजी पक्षाचे कार्यकर्ते व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

One Comment on “डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची नवीन कार्यकारिणी जाहीर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *