चीन, 03 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) चीनमध्ये सध्या एका नव्या आजाराने डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमधील लहान मुलांना सध्या श्वसनाचा आजार आणि न्यूमोनियाची लागण होत असल्याचे आढळून आले आहे. अशातच चीनमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनमध्ये या आजारामुळे दररोज 7 हजारांहून अधिक मुलांना येथील रुग्णालयात दाखल केले जात असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भारतासह जगातील सर्व देशांची काळजी वाढली आहे. तर या आजाराबाबत भारत सरकारने सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानंतर राज्य प्रशासनाने आरोग्य विभागाला श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ
तर दुसरीकडे मात्र हा आजार घाबरण्यासारखा नसल्याचे चीनने म्हटले आहे. तसेच हा आजार संसर्गजन्य नसून, तो कोणत्याही प्रकारचा फ्लू नसल्याचे चीनने म्हटले आहे. याशिवाय हा आजार नवीन नसल्याचा दावा चीनने केला आहे. तर यापूर्वी नव्या आजारासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने चीनकडे अहवाल मागितला होता. कोविड संदर्भातील निर्बंध उठवल्यामुळे फ्लूसारखे आजार वाढत असल्याचे चीनने जागतिक संघटनेला दिलेल्या या अहवालात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर!
दरम्यान, चीनमध्ये लहान मुलांमध्ये पसरणाऱ्या न्यूमोनिया संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत सतर्क झाला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट जारी केला होता. त्यानूसार सर्व राज्यांनी त्यांच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. या आजाराबाबत घाबरण्याची गरज नसून संसर्गाचा सामना करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे सरकारने म्हटले आहे. तसेच चीनमधील मुलांमध्ये संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या सर्दी, खोकला, ताप आणि श्वास घेण्यात अडचण यांसारखी लक्षणे असणाऱ्या मुलांची डॉक्टरांकडून अत्यंत काळजीपूर्वक तपासणी केली जात आहे.
One Comment on “चीनमध्ये नवा आजार; रोज 7 हजार मुले रुग्णालयात”