बारामती, 08 सप्टेंबर: बारामती मधील जनसेवा यात्रेनिमित्त राष्ट्रवादीच्या दोन ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी एकामेकांची अब्रूची लक्तरे कार्यकर्त्यांच्या समक्ष काढली. यामध्ये शहर आणि एक ग्रामीणच्या दोन पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी दोघांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांच्या समक्ष शाब्दिक वार करून एकमेकांचे कपडे फाडले व दोघेही कार्यकर्त्यांसमक्ष अर्धनग्न झाले. अशी चर्चा सध्या बारामतीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दूध संघाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला मलिदा गॅंग म्हणून हिणवल्यामुळे सुरू झालेले हे वाक युद्ध कालांतराने बारामतीचा ज्येष्ठ नगरसेवकाच्या आया बहिणी वर आले. हा वाद राष्ट्रवादीच्या युवा नेत्यांनी थांबवण्याच्या आतोनात प्रयत्न केला. यावेळी अक्षरशः युवा नेता हाता पाया पडून रडकुंडीला आल्यानंतर तसेच कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेप केल्यानंतर हे पदाधिकारी थांबले. ही बातमी बारामतीच्या राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली असून, राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये वाटणी, टक्केवारी आणि मलिदा यांच्यावरून सुरस कथा सध्या चर्चेला जाऊ लागल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला जनसामान्यांमध्ये बदनाम करण्याची सुपारी शरद पवार गटाने सुपारी दिल्याचे जावई शोध कार्यकर्त्यांनी लावला असून या सुपारी खोरांना व मलिदा गॅंगला अजित दादा लवकरच चाप बसवतील अशी कार्यकर्त्यांनी अपेक्षा केली आहे. तर जनसामान्य यात्रेच्या व्यासपीठाच्या परिसरात ही घटना घडल्याने अजित पवारांचे संघटनेवर पकड ढिल्ली झाल्याची चर्चा राष्ट्रवादी मधील कार्यकर्त्यांमध्ये चालू आहे.