मुंबई, 06 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा बुधवारी (दि.06) प्रसिद्ध करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने उमेदवार देण्यात आलेल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आज स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. त्यानुसार, यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून 50 मतदारसंघांमध्ये 50 स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
https://x.com/mahancpspeaks/status/1854091360296673651?t=vFIqD15wvTwmzA4ns4niBA&s=19
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1854095559033778352?t=nRwuqafYqM-3Z7RRYe_Q8A&s=19
अजित पवारांनी काय म्हटले?
“प्रत्येक मतदारसंघातील रहिवासी, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक यांच्याशी सखोल चर्चा करून त्यांच्या अपेक्षा आणि गरजांना या जाहीरनाम्यात प्राधान्य देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे,” असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे. “जे आपल्याला शक्य आहे आणि जे आपण पार पाडू शकतो, याच गोष्टींचा आम्ही विचार केलेला आहे,” असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. ते बारामती येथे पक्षाच्या जाहीरनामा प्रकाशित कार्यक्रमात बोलत होते.
https://x.com/mahancpspeaks/status/1854117968935870654?t=Tb_Gqt6tzQ3QMU4L20dgaw&s=19
जाहीरनाम्यात काय आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील लाभाची रक्कम 1500 वरून 2100 रुपये करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी पक्षाच्या या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे. तसेच शेतकरी सन्मानार्थ योजनेत दरवर्षी 12 हजारांहून 15 हजार रुपये देणार असल्याचे यामध्ये म्हटले आहे. राज्याच्या पोलीस दलात 25 हजार महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्यात येणार आहेत. वयोवृद्ध पेन्शन धारकांना आता 1500 वरून 2100 रुपये देण्यात येणार यांसारख्या घोषणा या जाहीरनाम्यातून करण्यात आल्या आहेत.