श्रीवर्धन मधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे विजयी

लाडकी बहीण योजना अपडेट 2025 – पैसे कधी मिळणार?

रायगड, 23 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातील निकाल जाहीर झाला आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आदिती तटकरे या विजयी झाल्या आहेत. आदिती तटकरे यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल नवगणे यांचा 82 हजार 798 मतांनी विजय झाला आहे. यावेळी आदिती तटकरे यांना 1 लाख 16 हजार 50 इतके मतदान झाले. तर अनिल नवगणे यांना 32 हजार 252 इतकी मते पडली.

https://x.com/ChakankarSpeaks/status/1860203181759955338?t=q9wZINALpmy2oqXCMFj7gw&s=19

दरम्यान, आदिती तटकरे या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आहेत. तसेच त्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. आदिती तटकरे यांच्या महिला व बालविकास मंत्रिपदाच्या कार्यकाळात राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली. आदिती तटकरे यांनी देखील महिला व बालविकास मंत्री म्हणून ही योजना राज्यभरात राबविण्यासाठी प्रयत्न केले होते. या योजनेला राज्यातील महिलांनी तुफान प्रतिसाद दिला. त्यामुळे आदिती तटकरे यांच्या विजयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे.

सलग दुसरा विजय

आदिती तटकरे यांचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून आदिती तटकरे यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांनी शिवसेना उमेदवार विनोद घोसाळकर यांचा 39 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा अदिती तटकरे यांचे विजयाचे लीड वाढल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, हा विजय आदिती तटकरे यांच्यासाठी आणि राष्ट्रवादी पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *