मुंबई, 2 जूनः राज्याच्या राजकारणात आज, 2 जुलै 2023 रोजी पुन्हा राजकीय भुकंप आला आहे. शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील फुटल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे त्यांच्या 40 आमदारांसह आज, राज्यपालांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
वाढदिवसानिमित्त अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज, अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील तर त्यांच्यासह आणखीन 9 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील, असे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. राष्ट्रवादीचे आदिती तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी नेते शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
वर्षभरावर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लागणार आहे. या निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी पक्षात मोठी फुट पडली आहे. या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुन्हा उभारी घेईल का?, की शिवसेना पक्षासारखी राष्ट्रवादीची अवस्था होईल? आता यानंतर शरद पवार कोणती भूमिका घेणार? याकडे राज्यभरासह देशाचे लक्ष लागले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त राजे प्रतिष्ठान न्यु इंग्लिश स्कुलचा पालखी सोहळा संपन्न
One Comment on “राष्ट्रवादी काँग्रेस फुटली; अजित पवार भाजपसोबत”