एनसीबीने ड्रग्ज रॅकेटचा केला पर्दाफाश, 4800 कोडीन सिरपच्या बाटल्या, 75 किलो गांजा जप्त

ठाणे, 10 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर भागात कार्यरत असलेल्या आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा यशस्वीपणे पर्दाफाश केला. याप्रकरणी एनसीबीने विविध प्रकारच्या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे. यावेळी त्यांच्याकडून 4800 कोडीन सिरपच्या बाटल्या, 75 किलो गांजा आणि काही लाखांची रोकड असा मुद्देमाल एनसीबीने जप्त केला आहे. मनीष पी, आकाश पी, राज के, मोहनीश एस आणि सनी जे असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

https://x.com/ANI/status/1822255426433359968?s=19

भिवंडी परिसरात कारवाई

हे सर्वजण ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर भागात विविध प्रकारच्या अमली पदार्थांचे रॅकेट चालवत होते. हे अटक केलेले सहा जण भिवंडी परिसरात एका वाहनात थांबले होते. त्यावेळी एनसीबीला संशय आल्याने त्यांनी त्यांच्या वाहनाची झडती घेतली. तेंव्हा त्यांच्या कारमधून ट्रॅव्हल्स बॅग, ट्रॉली बॅग आणि पोत्यांमधून एकूण 75 किलो गांजा जप्त करण्यात आला. तसेच यावेळी त्यांनी 4800 कोडीन सिरपच्या बाटल्या केल्या. सोबतच या सहा आरोपींकडून 1.18 लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. ही रोकड पूर्वीच्या अवैध अमली पदार्थांच्या विक्रीतून जमा करण्यात आली होती, अशी माहिती मुंबई एनसीबीने दिली आहे.



या ड्रग्ज रॅकेट प्रकरणी मनीष पी, आकाश पी, राज के, मोहनीश एस आणि सनी जे या सहा जणांना मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आहे. सध्या त्यांची चौकशी केली जात आहे. या चौकशीतून त्यांच्याकडून अमली पदार्थांच्या या रॅकेट संदर्भातील अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न एनसीबी करणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *