नाझरे धरण 100 टक्के भरले, तहसीलदारांनी दिली धरण प्रकल्पाला भेट

बारामती, 17 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) बारामती आणि पुरंदर तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणारे नाझरे धरण 100 टक्के भरले आहे. या पार्श्वभूमीवर, नाझरे धरण प्रकल्पाला बारामती तालुका तहसिलदार गणेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी नाझरे धरण प्रकल्पाची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच त्यांनी नाझरे धरण प्रकल्प उपअभियंता दत्तात्रय कसबे आणि शाखा अभियंता ए ए घोडके यांचा यावेळी सत्कार केला. याप्रसंगी बारामती दुध संघाचे चेअरमन पोपटराव गावडे, सरपंच पोपटराव तावरे, अशोकराव कोकणे, अनिलराव लडकत, दुध संघाचे व्हॉईस चेअरमन संतोष शिंदे, विश्वास पवार, शिवराज चांदगुडे, तेजस जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



दरम्यान, नाझरे धरण शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता 100 टक्के भरले आहे. नाझरे धरण प्रकल्पातंर्गत बारामती तालुक्यातील मोरगांव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील 16 गावांच्या पिण्याच्या पाण्याची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही नाझरे धरणावर अवलंबून आहे. तसेच शेतीच्या सिंचनासाठी देखील काही गावातील शेतीसाठी नाझरे धरणातून पाणी आवर्तन सोडले जाते. त्यामुळे या गावांच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *