छत्तीसगडमध्ये मतदानावेळी नक्षलवाद्यांचा हल्ला

रायपूर, 7 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) छत्तीसगड विधानसभा निवडणूकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात 90 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये 20 नक्षलग्रस्त भागांत देखील निवडणूक होणार आहे. या नक्षलग्रस्त भागांमध्ये मतदानाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी निवडणुक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार याठिकाणी पहिल्या 10 नक्षलग्रस्त भागांत सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान होणार आहे, तर उर्वरित 10 जागांसाठी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणूकीत 223 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

दरम्यान छत्तीसगडमधील सुकमा येथे आज मतदानावेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यावेळी ह्या नक्षलवाद्यांनी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच कांकेरच्या बांदे भागात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एके-47 जप्त केली आहे. त्यावेळी काही नक्षलवादी ठार किंवा जखमी झाल्याचीही बातमी आहे. याशिवाय दुरमा आणि सिंगारामच्या जंगलात नक्षलवाद्यांनी बीजीएलवर गोळीबार केला.

भारत-पाक सीमेवरील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण

तसेच कोंटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांदा भागात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात गोळीबाराची घटना घडली. याशिवाय छत्तीसगडमध्ये मतदान सुरू असताना सुकमा येथील तोंडामार्का भागात नक्षलवाद्यांनी आयईडी बॉम्बस्फोट केला. या घटनेत सीआरपीएफ कोब्रा बटालियनचा एक जवान जखमी झाला आहे. सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. नारायणपूर जिल्ह्यातील ओरछा पोलीस ठाण्याच्या तादूर जंगलात ही एसटीएफ आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. या पार्श्वभूमीवर, घटनास्थळी मोठी सुरक्षा वाढविण्यात आली आहे. याठिकाणी सध्या सीआरपीएफ आणि डीआरजीच्या मोठ्या तुकड्या तैनात आहेत. सुदैवाने येथील लोक सुरक्षित असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुण्यात साखळी बॉम्बस्फोटाचा कट

One Comment on “छत्तीसगडमध्ये मतदानावेळी नक्षलवाद्यांचा हल्ला”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *