मुंबई, 27 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची तिसरी यादी आज (दि.27) जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 9 उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आतापर्यंत उमेदवारांच्या तीन याद्या प्रसिद्ध केल्या असून यामध्ये 76 उमेदवारांची नावे आहेत. त्याचवेळी महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मधील काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हे तिन्ही पक्ष प्रत्येकी 90 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, यासंदर्भात आताच सांगणे कठीण आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? हे येत्या काही दिवसांत नक्कीच स्पष्ट होईल.
https://www.facebook.com/share/v/ge3ZSfTc8HnsKwYU/
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी
1) करंजा – ज्ञायक पटणी
2) हिंगणघाट – अतुल वांदिले
3) हिंगणा – रमेश बंग
4) अणुशक्ती नगर – फहाद अहमद
5) चिंचवड – राहुल कलाटे
6) भोसरी – अजित गव्हाणे
7) माझलगाव – मोहन जगताप
8) परळी – राजेसाहेब देशमुख
9) मोहोळ – सिद्धी रमेश कदम
https://www.facebook.com/share/v/at9hnLPtw34fPLct/
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी
1) एरंडोल – सतीश पाटील
2) गंगापूर – सतीश चव्हाण
3) शहापूर – पांडुरंग बरोरा
4) परांडा – राहुल मोटे
5) बीड – संदीप क्षीरसागर
6) आर्वी – मयुरा काळे
7) बागलान – दीपिका चव्हाण
8) येवला – माणिकराव शिंदे
9) सिन्नर – उदय सांगळे
10) दिंडोरी – सुनीता चारोसकर
11) नाशिक पूर्व – गणेश गिते
12) उल्हासनगर – ओमी कलानी
13) जुन्नर – सत्यशील शेरकर
14) पिंपरी – सुलक्षणा शिलवंत
15) खडकवासला – सचिन दोडके
16) पर्वती – अश्विनी कदम
17) अकोले- अमित भांगरे
18) अहिल्यानगर शहर -अभिषेक कळमकर
19) माळशिरस- उत्तमराव जानकर
20) फलटण – दीपक चव्हाण
21) इचलकरंजी- मदन कारंडे
22) चंदगड – नंदिनी कुपेकर