दिल्ली, 02 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) देशाच्या क्रीडा मंत्रालयाने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 च्या विजेत्यांची घोषणा केली आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी, 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता राष्ट्रपती भवनात करण्यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपतींकडून पुरस्कार विजेत्यांना त्यांचे पुरस्कार प्रदान केले जातील. यामध्ये भारत सरकारने मनू भाकर आणि डी गुकेश यांच्यासह 4 खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. तर 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये महाराष्ट्राचा ऑलिम्पिकपटू शूटर स्वप्नील कुसळे याचा समावेश आहे.
https://x.com/ANI/status/1874743593048654149?t=zl1KeOSeI_lxmblij3N8PQ&s=19
क्रीडा मंत्रालयाने विविध क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षक, विद्यापीठे आणि संस्थांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. या पुरस्कारांचे वितरण, समितीच्या शिफारशींनुसार आणि योग्य छाननी प्रक्रियेच्या आधारावर करण्यात आले आहे, असे क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024:
1. गुकेश डी – बुद्धिबळ
2. हरमनप्रीत सिंग – हॉकी
3. प्रवीण कुमार – पॅरा-ॲथलेटिक्स
4. मनु भाकर – शूटिंग
क्रीडा आणि खेळ 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार:
1. ज्योती याराजी – ऍथलेटिक्स
2. अन्नू राणी – ऍथलेटिक्स
3. नीता – बॉक्सिंग
4. स्वीटी – बॉक्सिंग
5. वंतिका अग्रवाल – बुद्धिबळ
6. सलीमा टेटे – हॉकी
7. अभिषेक – हॉकी
8. संजय – हॉकी
9. जर्मनप्रीत सिंग – हॉकी
10. सुखजीत सिंग – हॉकी
11. राकेश कुमार – पॅरा-तिरंदाजी
12. प्रीती पाल – पॅरा-ॲथलेटिक्स
13. जीवनजी दीप्ती – पॅरा-ॲथलेटिक्स
14. अजित सिंग – पॅरा-ॲथलेटिक्स
15. सचिन सर्जेराव खिलारी – पॅरा-ॲथलेटिक्स
16. धरमबीर – पॅरा-ॲथलेटिक्स
17. प्रणव सूरमा – पॅरा-ॲथलेटिक्स
18. एच होकातो सेमा – पॅरा-ॲथलेटिक्स
19. सिमरन – पॅरा-ॲथलेटिक्स
20. नवदीप – पॅरा-ॲथलेटिक्स
21. नितेश कुमार – पॅरा-बॅडमिंटन
22. तुलसीमथी मुरुगेसन – पॅरा-बॅडमिंटन
23. नित्य श्रे सुमथी शिवन – पॅरा-बॅडमिंटन
24. मनिषा रामदास – पॅरा-बॅडमिंटन
25. कपिल परमार – पॅरा-जुडो
26. मोना अग्रवाल – पॅरा-शूटिंग
27. रुबिना फ्रान्सिस – पॅरा-शूटिंग
28. स्वप्नील सुरेश कुसळे – शूटिंग
29. सरबज्योत सिंग – शूटिंग
30. अभय सिंह – स्क्वॅश
31. साजन प्रकाश – जलतरण
32. अमन – कुस्ती
क्रीडा आणि खेळ 2024 मध्ये उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार: (नियमित श्रेणी)
1. सुभाष राणा – पॅरा-शूटिंग
2. दीपाली देशपांडे – शूटिंग
3. संदीप सांगवान – हॉकी
द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)
1. एस मुरलीधरन – बॅडमिंटन
2. अरमांडो अग्नेलो कोलाको – फुटबॉल